TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शर्यत जिवावर बेतली: डंपरच्या धडकेत २ मित्र जागीच ठार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2022
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावर मित्रांसोबत दुचाकीची शर्यंत लावणे वर्गमित्र असलेल्या दोन तरुण अभियंत्यांच्या आयुष्याला पूर्णविराम देणारे ठरले. कारण, इतरांपेक्षा वेगाने पुढे निघण्याच्या बेतात त्यांची १०० किमी वेगातील दुचाकी पुढील डंपरला धडकली. त्यात दोघे रस्त्यावरच गतप्राण झाले. अरफाज मो.इम्तियाज कासीम (वय २२) आणि विष्णू गोविंद कारमुंगे (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. ऐन लक्ष्मीपूजनाला सोमवारी रात्री ११.३० वाजता ही दुर्घटना घडली.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

शहरातील खडका रोडवरील आझाद मार्केट, ३ नंबर उर्दू शाळेजवळील रहिवासी अरफाज मो. इम्तियाज कासीम (वय २२) व गरूड प्लॉट भागातील त्याचा मित्र विष्णू गोविंद कारमुंगे (वय २२) यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण रेल्वे स्कूलमध्ये घेतले. शहरातील एसएसजीबी अभियांत्रिकी कॉलेजमधून बीईची पदवी घेतली. यानंतर पुणे येथे नोकरीला असलेला अरफाज दिवाळीच्या सुटीत शनिवारी (दि.२२) भुसावळात आला. त्याला सोमवारी रात्री ८.३० वाजता विष्णूचा कॉल आला. यानंतर अरफाजने आई व लहान भाऊ फरहान याला विष्णूसोबत बाहेर जात असल्याचे सांगितले. तिकडे विष्णूला देखील त्याच्या आईने दिवाळी असल्याने बाहेर न जाण्याची सूचना केली. तरीही दोघे घराबाहेर पडले. यानंतर अपघात झाला. ही माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. विष्णूवर रात्री, तर मंगळवारी दुपारी अरफाजवर अंत्यसंस्कार झाले. दोघांची अपघातग्रस्त दुचाकी तिसऱ्याच मित्राची आहे. घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोहंमद सलीम महेमूद कासीम यांच्या माहितीवरून गुन्हा दाखल झाला.

शर्यतीत चारपैकी तीन दुचाकी निघाल्या पुढे
सोमवारी रात्री अरफाज व विष्णू एका दुचाकीवर, तर इतर मित्र तीन वेगवेगळ्या दुचाकींवर महामार्गावर आले. तेथे त्यांची साकेगाव ते तनारिका हॉटेल हे अंतर जो आधी पार करेल त्यास १० हजार रुपये मिळतील, अशी शर्यत लागल्याची माहिती समोर आली. दरम्यान, तीन केटीएम आणि एका बुलेटवर स्वार असलेले हे मित्र १०० पेक्षा जास्त वेगाने साकेगावकडून हॉटेल तनारिकाकडे निघाले. अरफाज व विष्णू हे एमएच.१९-सीटी.८५७२ या क्रमांकाच्या केटीएम बाइकवर होते. महामार्गावरील मुन्ना तेली यांच्या पेट्रोल पंप परिसरात पटेल टी हाऊस समोर अरफाजचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती पुढील डंपरला धडकली. यानंतर अरफाज व विष्णू हे जागीच ठार झाले.

दोघे जागीच गतप्राण
रात्री ११.३० वाजता अरफाजचे काका मो. सलीम महेमूद कासीम यांना अपघाताची माहिती मिळताच ते व अरफाजचे पत्रकार असलेले वडील मो. इम्तियाज (छोटू) हे घटनास्थळी आले. यावेळी दोघे मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रिक्षातून डॉ. राजेश मानवतकर यांच्या हॉस्पिटलला नेण्यात आले. पण, उपयोग झाला नाही.

विष्णू कुटुंबातील एकुलता एक
मूळ बिदर (कर्नाटक) येथील रहिवासी असलेले विष्णूचे वडील रेल्वेचे कर्मचारी आहेत. ते गेल्या २० ते २२ वर्षांपासून गरूड प्लॉट भागात वास्तव्यास आहेत. त्यांना विष्णू आणि एक मुलगी असे अपत्य आहेत. मुलगी बारावीनंतरचे शिक्षण घेत आहे. तर बीईनंतर विष्णू पुण्यात नोकरीसाठी प्रयत्न करत होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

धरणगावात गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताचा नातेवाईकांचा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने सपत्नीक घातले महादेवाला साकडे !

November 22, 2024

सिनेसृष्टीत ‘सन्नाटा’ ! ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन

April 20, 2021

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी धरणगावचे लक्ष्मण पाटील यांची निवड !

February 28, 2023

तक्रार मागे घेण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी ; जळगाव एमआयडीसी परस्पर विरोधी गुन्हे !

November 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group