चोपडा :-(प्रतिनिधी )
अमर संस्था संचालित 41 वा वर्धापन दिनानिमित्ताने बालमोहन विद्यालयात 2025 बाल महोत्सवचे विद्यार्थ्यांना कालागुणाचे वाव मिळावे यासाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या बाल महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे,प्रमुख पाहुणे चोपडा चहाडी॔ केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे केंद्रप्रमुख दीपक पाटील निमगव्हाण संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित दिप प्रज्वलन व परम पूज्य साने गुरुजी व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले यावेळी दहावी बारावी परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले व बालमोहन विद्यालयातील शिक्षिक यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल स्काऊट गाईडसाठी स्मिता बाविस्कर यांचा सत्कार सत्कार गटशिक्षण अधिकारी कविता सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला आणि शालांत परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मनोगत करताना सांगितले ज्यांच्यासाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या हाती सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली त्यातूनच विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळते यातूनच विद्यार्थी घडत असतो असेही गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी सांगितले व साने गुरुजी आदर्श बालवाडीचे मुख्याध्यापिका रेखा नेवे यांनी प्रास्ताविक भाषणात पालकांना आव्हान केले की आजच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईलचे अति प्रमाणात विद्यार्थ्यांकडून वापर होत आहे यावर पालकांनी आपला पाल्यांना मोबाईल व्यसनापासून दूर ठेवा व पुस्तकी ज्ञान कसं वाढेल यावर लक्ष द्या यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य गुजराती रिमिक्स व मराठी लावणी अहिराणी गीत बेटी बचाव बेटी पढाव विठू माऊली यावर देखावा सादर केला शिवराज्याभिषेक बालकामगार,शिवाजी महाराजांवरील पोवाडे आजचे घडीला सोशल मीडियाचा दुष्परिणाम यांसह विविध गाण्यांवर नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली व बालगोपाळांनी धमाल केली यावेळी शाळेच्या आवारात आकर्षक असे सेल्फी पॉईंट ठेवून चिमुकल्यांनी फोटोशूट केले आणि सूत्रसंचालन मयूर सोनवणे स्मिता बाविस्कर यांनी केले यावेळी शाळेचे व्यवस्थापक मंडळ यांच्यासह अमर संस्था संचालित बालमोहन विद्यालयातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.