पाळधी(प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील मोहम्मद ताहेर पटनी उर्दू हायस्कूल पाळधीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक मुश्ताक करीमी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ रोजी चित्रकला स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपशिक्षक अकील अजीज व रुबीना रसूल यांनी याचे अचूक नियोजन केले. शाह सईद यांनी मार्गदर्शन केले.
दिनांक १० रोजी भव्य प्रभात फेरी सकाळी काढण्यात आली ही प्रभात फेरी गोविंद नगर, हाजी उस्मान नगर व नम्रा कॉलनी येथून निघाली शिष्तबध्दरित्या विद्यार्थ्यांनी कितना प्यारा देश हमारा देश हमारा कितना प्यारा हमारी शान है भारत हमारी जान है भारत भारत अपना गुलशन है भारत दिल की धडकन है
हे घोषवाक्य देऊन परिसर दणाणून गेले त्यानंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांवर भाषणे आणि त्यांच्या परिचय विद्यार्थ्यांनी सादर केला अकील अजीज यांनी गावाच्या इतिहास व रुबीना रसूल यांनी देशाच्या इतिहासावर प्रकाश टाकले. मुख्याध्यापक मुश्ताक करीमी यांनी यावेळी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांना सलाम केले. कार्यक्रम सूत्रसंचालन वसीम शेख यांनी तर आभार प्रदर्शन नईम बिस्मिल्ला यांनी केले. यावेळी चिराग काझी व जहूर देशपांडे उपस्थित होते