जळगाव(प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिरसोली, वडली आणि पात्री येथे देवी भक्तांनी सप्तशृंगी गडावरून आणलेल्या ज्योतीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्यात सुख समृद्धी नांदू दे, बळीराजाला मुबलक धनधान्य पिकू दे, नागरिकांना चांगले आरोग्य लागू दे, असे साकडे यावेळी देवकर यांनी दुर्गा मातेला घातले.
पाथरी येथे ज्योतीच्या दर्शनाप्रसंगी देवकर यांच्यासह दिलीप धनगर, राजेश कोलते, पाचोरा येथील प्रकाश पाटील व ग्रामस्थ निलेश पाटील, भीमराव पाटील, अरुण पाटील, संतोष नेटके, सुकलाल नावे, प्रताप पाटील, नाना हरी, मोहम्मद पठाण, डॉ अरुण पाटील, शांताराम पाटील, वसंत माळी, एकनाथ माळी, संभाजी पाटील, कैलास जाधव, मोठाभाऊ सोनवणे, गणेश धनगर, गोविंदा धनगर, प्रताप तात्या, रोशन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरसोली येथील भाविकांची पावागढ ते शिरसोली ज्योत यात्रा येत असताना आप्पासाहेब देवकर यांनी मशाल यात्रेला भेट दिली व ज्योत चालती केली. यावेळी समस्त शिवनेरी ग्रुप पाटील वाडा्,. शिवनेरी मित्र मंडळाचे अध्यक्ष सोपान पाटील, उपाध्यक्ष रवी (आण्णा), गोलू पवार, भूषण पाटील, आबा पाटील, जितेंद्र पाटील, विकास पाटील, बबलु पाटील, कैलास पाटील, मयूर पाटील, घनश्याम देसले, समा पाटील, राहुल पाटील, हर्षल पाटील, आदी उपस्थित होते. वडली येथील ज्योत दर्शन प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.