धरणगाव (प्रतिनिधी) आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. या निमित्ताने सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त एकत्र आले होते.
माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटीलसर, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र उपप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, पप्पू भावे, विलास महाजन, वाल्मिक पाटील, बाळू जाधव, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, दैनिक बातमीदारचे संपादक भरतकुमार चौधरी, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रा. बी.एन.चौधरी, सत्यशोधक समाजाचे पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील, आबा वाघ, हेमंत माळी, कैलास पवार, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, राहुल जैन, मयुर भामरे, पत्रकार कडू महाजन माळी समाज अध्यक्ष महाजन, पाटील समाज अध्यक्ष भिमराज पाटील, सुनील चौधरी, दीक्षा गायकवाड अशा बहुसंख्य अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.