TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक! मुक्ताईनगर येथे रक्षा खडसेंच्या मुलीची छेड

माझ्या मुलीसोबत जे घडले ते फार गंभीर - रक्षा खडसे

vijay waghmare by vijay waghmare
March 2, 2025
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे. माझ्या मुलींसोबत पोलीसांच्या ड्रेसमधील माणूस असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडत असेल तर हे फार गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्‍यांशी दोन वेळा बोलली, त्यांनीही सूचना दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान एका 18 वर्षीय युवतीसह तिच्या मैत्रिणींची छेडछाड केली. यातील पहिली घटना 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या स्टॉलजवळ घडली. या ठिकाणी आरोपी अनिकेत भोई याने या मुलींकडे पाहून अश्लील हातवारे केले. यानंतर 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8:45 वाजता या मुली यात्रेत फिरत असतांना आकाश पाळण्याजवळ अनिकेत भोई याच्यासह पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे यांनी फिर्यादी व तिच्या मैत्रीणींचा पाठलाग करून त्यांच्या सोबत लज्जास्पद कृत्य करत विनयभंग केला. तसेच त्यांनी या मुलींचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढला.

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर 18 आणि 16 वर्षे वयाच्या मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात 1) अनिकेत भोई, 2) पियुष मोरे, 3) सोहम कोळी, 4) अनुज पाटील, 5) किरण माळी, 6) चेतन भोई आणि 7) सचिन पालवे (सर्व राहणार मुक्ताईनगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या सर्वांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75 (1) (आय); 78 (2); 79; 189 (2); सह लैंगीक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 8 आणि 12 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते व सहायक पोलीस निरिक्षक जयेश पाटील हे करत आहेत.

काय म्हणाल्या रक्षा खडसे
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड काढली. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी आक्रमक पावित्रा घेत तक्रार दाखल केली. यानंतर रक्षा खडसे यांनी नेमकं काय घडलं, याबद्दलची सविस्तर माहिती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत मुक्ताबाईंची यात्रा असते. त्या यात्रेनिमित्त अनेक लोक सहभागी होत असतात. परवा रात्री मी गुजरातला होते. आज सकाळीच मी इथे आली. परवा माझ्या मुलींचा फोन आला, त्यांनी मला यात्रेत जायचं असं सांगितलं. मी त्यांना सांगितल की सुरक्षारक्षकाला सोबत घेऊन जा. तसेच तुझ्या मैत्रिणी आणि ऑफिसमधील दोन तीन लोकांना सोबत घेऊन जा. कारण दरवर्षी गर्दी असते. धक्काबुक्की होते. त्यामुळे थोडी सुरक्षा असायला हवी. पण तिथे गेल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी त्यांचा पाठलाग केला, असे रक्षा खडसेंनी म्हटले. त्यांच्या पाळण्यात शेजारी जाऊन बसले. आमच्या सुरक्षारक्षकाने त्यांना दुसऱ्या पाळण्यात बसवलं, तर तिथेही ही टवाळखोर मुलं त्यांना त्रास द्यायला लागले. तसेच सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की केली. मुलींचीही छेड काढली. सत्ता कोणाचीही असो, शेवटी प्रशासनाकडे जेव्हा तक्रार येतात, तेव्हा गंभीर कारवाई झाली पाहिजे. माझ्या मुलींसोबत पोलीसांच्या ड्रेसमधील माणूस असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडत असेल तर हे फार गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्‍यांशी दोन वेळा बोलली, त्यांनीही सूचना दिली आहे, अशी माहिती रक्षा खडसेंनी दिली आहे.

आरोपींवर कडक कारवाई होईल – देवेंद्र फडणवीस
दुर्देवाने या प्रकरणात विशिष्ट पक्षांचे काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केलंय. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. काहींना अटक देखील झालेली आहे. इतरांनाही अटक होईल. पण अशा प्रकारे छेडछाड करणं, सार्वजनिक ठिकाणी त्रास देणं, अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही परिस्थिती अशा लोकांना माफी देता कामा नये. आरोपींवर अतिशय कडक कारवाई होईल’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या २६७ विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएमसी म्हणतेय, ‘मुंबईत १८ वर्षावरील नागरिकांना लस नका देऊ नका’

April 27, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १३ सप्टेंबर २०२२ !

September 13, 2022

भुसावळच्या तृतीयपंथी चाँदने मारले पोलिस भरतीचे मैदान !

March 29, 2023

साडेश्वर शिवमंदिर आणि भवानी माता मंदिर परिसराची प्रतापराव पाटील यांच्याकडून पाहणी !

October 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group