अमळनेर (ईश्वर महाजन) : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस तो दिवस देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधत शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. इयत्ता आठवी नववी दहावीतील विद्यार्थ्यांनी कबड्डी, रस्सीखेच, लिंबू चमचा, संगीत खुर्ची ,गोणपाट स्पर्धौ घेण्यात आल्या. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे दिले जाणार आहेत .यावेळी स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व भाऊसाहेब एन.जी.देशमुख यांनी केले. क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतीक प्रतिनिधी आय आर महाजन, स्काऊट शिक्षक एस. के महाजन ,एच.ओ माळी शिक्षकेतर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.