TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्री.मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामांचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2023
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी ‘श्री मंगळ जन्मोत्सव’ परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. मंदिर परिसरासह शहरातही विविध विकास कामांची उद्घाटने होतील.

येथील बसस्थानकात अ‍ॅक्वाचिल्ड (शुद्ध व गार) पाणीपुरवठा करणाऱ्या अद्ययावत ‘श्री मंगल जलकुंभा’चे उद्घाटन व आगमन आणि निर्गमन भव्य प्रवेशद्वारांचे भूमिपूजन होणार आहे. राज्यातील नितांत सुंदर पोलिस चौकींच्या श्रेयनामावलीत अग्रेसर ठरेल अशा पैलाड भागातील ‘श्री मंगळग्रह पोलिस चौकी’चेही उद्घाटन होईल.तसेच श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील नवीन भव्य स्वयंपाकगृह, नवीन अभिषेक बुकिंग कार्यालय, रेडिओ मंगलध्वनी हा आमच्या संस्थेचा रेडिओ व अद्ययावत रेडियो केबिन, श्री मंगळग्रह मंदिराचे ग्लासवर्कने केलेले सुशोभीकरण, ‘आय प्रे मंगल’ कलाकृती आदींचे उद्घाटने होतील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

नाल्यावरील दमदम्याच्या कामाचे भूमिपूजन होईल.तसेच लवकरच आगळ्यावेगळ्या शैलीत दैनिकात परावर्तीत होणाऱ्या साप्ताहिक ‘महातेज’ व मासिक ‘मंगल कामना’ या मासिकाचेही प्रकाशन होणार आहे. शिवाय विविध स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन, शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व पत्रकारांसाठीही कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

उद्घाटनपर सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील असतील तर उद्घाटक, मार्गदर्शन व प्रकाशक म्हणून खासदार उन्मेश पाटील लाभणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मा. आ. स्मिता वाघ, मा.आ. शिरीष चौधरी, विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, पुण्याचे ख्यातनाम उद्योगपती वेंकटेश राव, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, माय एफ. एम. रेडिओचे इंडिया हेड सौरभ वाडेकर, जैन उद्योग समुहाचे व्हाईस प्रेसिडेंट (मीडिया) अनिल जोशी, अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर, पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, एस. टी. महामंडळ, जिल्हा विभाग नियंत्रक भगवान जगनोर, प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, व्हाईस ऑफ मीडिया (उर्दु विंग)चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, प्रदेशाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, रोमीफो इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी, म.रा.म. पत्रकार संघाचे उ.म. अध्यक्ष प्रवीण सपकाळे, नाशिकचे ख्यातनाम करिअर कौन्सिलर राजेंद्र वर्मा आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

शहरातील सर्व महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते पालखी पूजन, पालखी मिरवणूक, श्री स्वामी समर्थांची आरती, श्री महादेवांची आरती, श्री मंगळग्रह मंदिरातील विविध महाआरत्या सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान होणार आहेत. कार्यक्रमात पहिली संबळवादक नाशिक येथील तरुणी कु. मोहिनी भूसे यांचे संबळवादन हे विशेष आकर्षण असणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

June 20, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

June 19, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2025

June 18, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

June 17, 2025
जळगाव

पंडित मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त ५२५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ६० जणांचे रक्तदान

June 16, 2025
चाळीसगाव

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

June 16, 2025
Next Post

जळगावातील कुविख्यात गुन्हेगार 'आझाद' स्थानबद्ध ; नाशिक कारागृहात रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बारावी बोर्ड परीक्षा : 15 डिसेंबरपासून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार

December 13, 2020

मोठी बातमी : ‘५ कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन’ ; धनंजय मुडेंना महिलेकडून धमकी

April 21, 2022

काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं : मुख्यमंत्री

July 6, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२ !

October 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group