TheClearNews.Com
Thursday, June 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ !

मुलांच्या गटात दक्ष गोयल आघाडीवर तर मुलींमध्ये बंगालच्या अग्रमानांकित मृत्तिका मल्लिकचे जोरदार पुनरागमन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी खेळवण्यात आलेल्या नवव्या फेरीत अनेक रंगतदार सामने पहावयास मिळाले. आता स्पर्धा शेवटच्या दोन फे-यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पिछाडीवर वाटणाऱ्या अनेक खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत ‘अजून आम्ही स्पर्धेत आहोत’ असं म्हणत सर्वांना सावधान केले आहे.

मुलींच्या गटात आतापर्यंत महाराष्ट्राची संनिद्धी भट आगेकुच करत होती. मात्र परवा तिला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ती थोडी खाली गेली. मात्र आता स्पर्धेच्या सुरुवातीपासून चर्चेत असणारी प.बंगालची अग्रमानांकित मृत्तिका मल्लिक ने महिला फिडे मास्टर शुभि गुप्ताला पराभवाचा झटका देत पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. इटालियन गिको पियनो पद्धतीत झालेल्या या सामन्यात काळ्या सोंगट्यानिशी खेळताना शुभि ने घोडा व वजिराच्या बचावात्मक चाली चुकवल्या त्याचा फायदा घेत, मृत्तिका ने काळ्या राजावर जोरदार हल्ला चढवत अवघ्या ३३ चालितच डाव संपवला. दुसऱ्या पटावर संनिद्धी भटने स्कँडीनावियन ओपनिंगचा वापर करत मिडल गेम मध्ये घोडा विरुद्ध उंटाचा गुणात्मक फरक प्रबळ केला, पण अंतिम स्थितीत तुलनात्मक फरक नसल्याने दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. तिसऱ्या पटावर आमूक्ता गुंटकाने फिलिडोर ओपनिंग मध्ये साची जैन विरुद्ध मोकळ्या ‘डी’ पट्टीवर मोहऱ्याची मारामारी केल्याने जिंकण्याची संधी दोन्ही खेळाडूंनी गमावली आणि सरतेशेवटी डाव अनिर्णीत राहिला. चौथ्या पटावर कर्नाटकच्या अक्षया साथी ने सपर्या घोषचा पराभव करत आपले आव्हान कायम ठेवले.

READ ALSO

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

मुलांच्या गटात पहिल्या पटावर जिहान शाहच्या वजिराच्या ड ६, उंटाच्या सी ३ जागेवरील अप्रतिम खेळ्यानंतर उंटाची सी ६ घरावरील कमकुवत चालीला पारसने वजिराच्या बाजूला राजा संरक्षित करत प्रतिहल्ला चढवला पण मिडलगेम मध्ये परिस्थिती तीन वेळा आल्याने बरोबरी घोषित करण्यात आली. पण खरे बुद्धिबळ द्वंद्व पाहिला मिळाले ते दुसऱ्या पटावर, फ्रेंच विनौवर पध्दतीने खेळल्या गेलेल्या या डावात हत्तीच्या डी ६ चालीपेक्षा हत्ती ची ‘डी ७’ जागेवर खेळली गेलेली चाल मध्य प्रदेशच्या माधवेंद्राला महागात पडली. ह पट्टीतील प्यादे पुढे ढकलत दक्षने अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरू केली आहे. तिसऱ्या पटावर महाराष्ट्राच्या कुशाग्र ने फिडे मास्टर इम्रानला वजीराच्या अंतिम स्थितीत बरोबरीत रोखले. चौथ्या पटावर आणि पाचव्या पटावर वत्सल सिंघला आणि अदक बीवोर यांनी अनुक्रमे विघ्नेश वेमुला व अनिरुद्धला मात देत निवड प्रक्रियेत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.

मुलांच्या गटात साडे सात गुणांसह दक्ष गोयल निर्विवाद आघाडीवर असून पाच खेळाडू ७ गुणांसह द्वितीय स्थानावर तर ४ खेळाडू साडे सहा गुणांसह तृतीय स्थानावर आहेत. अजिंक्यपद स्पर्धेमध्ये चुरस वाढत असून स्पर्धेचे विजेतेपद कोण मिळवेल याची उत्कंठा अजूनही ताणलेली आहे.

जळगाव जिल्हाचेस असोसिएशनचे सचिव नंदलाल गदियांनी दिल्या स्पर्धकांना शुभेच्छा…!

नवव्या फेरीच्या सुरुवातीला जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव नंदलाल गदिया यांनी सहभागी स्पर्धकांशी संवाद साधला, त्यांनी सर्वांना उद्देशून म्हटले कि, सर्वांनी विद्यार्थिदशेचा पुरेपूर आनंद घ्या आणि आपल्या आवडत्या खेळात किंवा गोष्टीत मन लावून कार्य करा. यश अपयशला खेळ भावनेने घ्या. असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025
जळगाव

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

June 25, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

June 25, 2025
क्रीडा

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
जळगाव

पाळधी गावात ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

June 25, 2025
जळगाव

पोलीस दलातील 19 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या

June 25, 2025
Next Post

जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

40 वर्षं मुलगा बनून घरात राहिला आणि दोन कोटींची जमीन विकली ; न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

April 12, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,४०३ कोरोनाबाधित, २८१ रुग्णांचा मृत्यू

September 18, 2021

आधी साखळदंडाने बांधले, डोक्यात घाव घातला नंतर जखमेवर मीठही चोळले ; मग गळा आवळून केला पत्नीचा निर्घुण खून !

April 28, 2023

पुतळा जाळून आणि पोलिसात कोंबड्या जमा करून नारायण राणेंचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे निषेध !

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group