मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल करत दोन फोटो ट्वीट केले आहेत. हे फोटो समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्टॉरंट अँड बारचे आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्यात क्रांतीने या बारबाबत तिची माहिती दिलीय. तसेच नवाब मलिक यांच्यावर ‘फर्जीवाडा’ हा त्यांचाच शब्द वापरून टीका केली आहे.
क्रांती रेडकरने दोन फोटो ट्वीट केले आहेत. हे फोटो समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्तराँ अँड बारचे आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्या फोटोत या बारची माहिती दिली आहे. यासोबतच मलिकांवर ‘फर्जीवाडा’ शब्द वापरुन टीका केली आहे. ट्वीटसह क्रांती म्हणते, पहिल्या फोटोत बारचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्तराँ अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा’. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा, जबाबदार पदावर बसून हे असं वागताहेत. हे केवळ समीर वानखेडे यांचं नाव खराब करण्यासाठी सुरू आहे, असं क्रांती म्हणाली. दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केला होता.