अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर-चोपडा रोडवरील सावखेडा शिवारात एका आश्रम शाळेजवळ अमळनेर पोलिसांची धाडसी कारवाई करत दीड लाखाचा गांजा पकडला आहे. पोलिसांनी जगदीश काशिनाथ पाटील (वय, ३१, रा. निमगव्हाण ता.चोपडा) या संशयित आरोपीला अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना ३० एप्रिल रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, सावखेडा शिवारातील चोपडा ते अमळनेर रोडचे लगत असलेल्या आईसाहेब कुसुमबाई मोरे एस. सी. मुलामुलीची आश्रम शाळेजवळचे बोडाजवळ एक अज्ञात व्यक्ती गांजा विक्री करत आहे. पो.नि. तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आश्रम शाळेजवळच्या बोडाजवळ धाड टाकून जगदीश काशिनाथ पाटील या ताब्यात घेतले असता त्याच्याकडून ९ किलो ६४७ ग्रॅम वजनाचा अंदाजे १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा गुंगी आणणारा गांजा मिळून आला. याबाबतीत पो.ना. मिलिंद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश पाटील विरुद्ध एन.डी.पी.एस.कायदा कलम ८,२०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि./जयपाल हिरे हे करीत आहेत.