जळगाव (प्रतिनिधी) जामनेर येथील माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या ग्लोबल मल्टिस्पेशलटी हॅास्पीटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे धमकी देणारा आरोपी राजू देशमुख (वय ३२,रा. पहुरपेठ, ता. जामनेर) हा पाचोरा एसटी डेपो येथील बस कंडक्टर आहे.
जामनेर येथील माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या ग्लोबल मल्टिस्पेशलटी हॅास्पीटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सायबर क्राईम व स्थानीक गुन्हे शाखेच्या व जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध लावत धमकी देणाऱया व्यक्तीला पकडले आहे. धमकी देणारा पाचोरा एसटी डेपो येथील बस कंडक्टर असून तो जामनेर तालुक्यातील पहुर येथील रहिवासी आहे. जामनेर येथील गिरीश महाजन यांच्या हॅास्पीटलचे उदघाटन फडवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले होते. यावेळी कार्यक्रम सुरू होण्यापूवी गिरीश महाजन यांचे स्विससहाय्यक दिपक तायडे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून एक करोड रुपये द्या, अन्यथा हॉस्पिटल उडवून देईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी राजू देशमुखला गुरूवारी पोलिसांनी अटक असून त्याच्याजवळून १३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपी पाचोरा डेपो येथे बस कंडक्टर म्हणून कामाला आहे. आरोपीला न्यायालयात आरोपीस हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास करणाऱ्या पथकात जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, एलसीबीचे पोलीस पोलीस निरीक्षक बापू रोहम, जामनेर पोलीस स्टेशनचे फौजदार किशोर पाटील, हेड कॅान्सटेबल रमेश कुमावत, राहूल पाटील, किशोर पाटील, रमेश कुमावत, राहूल पाटील, आसिफ फठाण, विजयसींग पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांचा समावेश होता.