धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विहीर फाट्याजवळ एकाचा सिनेस्टाईल पाठलाग करत गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपाल मालचे, असे मृताचे नाव असून, त्याच्यावर रस्त्यात गाडी अडवून, खाली उतरताच डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत थरारक असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दोन ते तीन फायर केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी हा स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून प्रारंभिक तपासानुसार, जुन्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी पवन देसले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.