धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयातून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात अधिक असे की, संजु तुफानसिंग आर्या (वय २४, व्यवसाय- मजुरी रा. धरणगाव शिवारात जुना पिंपळे रोड जवळील हरिभाऊ महाजन यांच्या मळ्यात मु. रा. मोहाडी फल्ला, भूलगाँव दादवाडा ता. नेवाली जि. वडवाणी म.प्र. ) हे कामानिमित्त दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांची दुचाकी स्प्लेंडर कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली/ आर्या यांनी जुबाजुच्या परीसरात शोध घेतला. परंतू दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी अनोळखी चोरट्यांविरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला. पुढील तपास स. फो. रामदास पावरा हे करीत आहेत.