भुसावळ (प्रतिनिधी) ईलेक्ट्रीकसीटी बोर्डमधून बोलत असल्याची बतावणी करून वीज बिलच्या नावाखाली एकाच्या खात्यातून तब्बल १ लाख ४८ हजार परस्पर वळते केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील कंडारी घडला आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुरेश तुळशीराम जोनवाल हे कंडारी गावात राहतात. त्यांना २२ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ९८८३३७६२८७ वरील मोबाईल धारक व्यक्तीने जोनवाल यांना व्यक्तीने फोन करून सांगितले की, मी इलेक्ट्रीसीटी बोर्ड आफिसमधून बोलत आहे. तुम्ही जे इलेक्ट्रीक सीटीचे बील १८१० रुपये ऑनलाईन भरले ते आमचे सीस्टीममध्ये अपडेट झालेले नाहीय, ते अपडेट करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला मी ईलेक्ट्रीक बोर्डाची लींक पाठवतो. ती लींक तुम्ही ओपन करुन फॉरमेटमध्ये तुमचा ग्राहक नंबर टाकून १० रुपये भरायचे आहेत. तसेच त्यानंतर बँक एटीएम पीन नंबर टाकायला सांगितला. तसेच १० रुपये पुढचे वेळेस वजा होतील, असे सांगितले. सदर लींक त्याने २ ते ३ वेळा परत परत रीपीट करायला लावली. त्यानंतर त्याने सांगितले की, तुमचे एचडीएफसी बॅकमधून ही प्रोसेस होत नाहीय. तुम्ही एसबीआय बँकेचा पीन नंबर टाका. त्यावेळी जोनवाल यांनी पीन टाकला असता त्याच्या एचडीएफसी बॅक खात्यामधुन ५० हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. तसेच स्टेड बॅक खातून ४९,९९६ तर बँक ऑफ इंडीया खात्यातून ५० हजार, ४३ हजार आणि ५५ हजार असे चार ट्राजेक्शन झाले होते. त्यापैकी रक्कम ४९ हजार ९९६ रुपये आणि ५० हजार अशी रक्कम परत मिळाली. परंतू एचडीएफसी बॅक खात्यातील रक्कम ५० हजार व स्टेट बॅक आफ इंडीया खात्यातील रक्कम ४३ हजार आणि ५५ हजार रुपये अशी एकुण रक्कम १ लाख ४८ हजार रुपये दोन्ही खात्यातून ऑनलाईन ट्रान्सफर करुन जोनवाल यांनी फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो. नि. गजानन पडघन हे करीत आहेत.