अमळनेर (प्रतिनिधी) येथील सानेगुरुजी पतपेढी जवळ धुळेरोड, राजेसंभाजी नगर येथे राहणाऱ्या डॉक्टरांची ऑनलाईन हेडफोन खरेदी करताना ३ लाख रुपयांत फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. राजेश साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, डॉ. राजेश साहेबराव पाटील (वय ४४ रा. राजेसंभाजी नगर, सानेगुरुजी पतपेढी जवळ धुळेरोड अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२३/०१/२०२२ रोजी दुपारी ०१.३० वाजेच्या सुमारास मी फेसबुक मधील razor pay या लिंकवर आलेल्या JBL कंपनीचे हेड फोन घेण्यासाठी माझे मोबाईल क्रमांक ९९२२११५१५३ याद्वारे फोन पे या अँपने razor pay या लिंक वर ५९९ रुपये पे केले होते. त्यानंतर दि.३०/०१/२०२२ रोजी दुपारी ०३.३० वाजता मी बुक केलेले हेड फोन अजुन कसे आले नाहीत. याबाबत चौकशी करणेसाठी गुगलमध्ये जावून razor pay चा टॉल फ्री क्रमांक १८००६५६५०० हा मिळाल्याने मी सदर क्रमांकावर फोनकॉल केला असता त्यांनी आम्हास टेक्स मॅसेज करुन +९१९३३०४२८१९४ या नंबर वर कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्या नंबरवर कॉल करुन हेड फोन बाबत विचारपुस करता सदर इसमाने मला हिंदी भाषेत तुम्हाला ऑर्डर मिस मँच हो गया है आपके पत्तेपर हम हेड फोन नही भेज सकते तुमको पेमेन्ट रिफन्ड चाहीए तो फिरसे फोन पे पर जाकर UPI आयडी मध्ये जावुन ATM पर्याय येईल बाबत सांगितले होते व माझे ATM कार्ड पुढील असलेला नंबर टाकण्यास सांगितले.
सदर नंबर हा मी टाकला त्यानंतर त्यांनी ATM चे मागील बाजुस असलेला ३ अंकी CVV नंबर टाकण्यास सांगितला सदर नंबर मी टाकला त्यानंतर त्याने मला सांगितले की, उद्या सकाळी १० वाजता तुमच्या अकाउंटमध्ये रिफन्ड होऊन तुमचे ५९९ रुपये येतील असे सांगितले. त्यानंतर मला दि. ३१/०१/२०२२ रोजी लक्षात आले की, दि. ३०/०१/२०२२ रोजी सकाळी ०८.३१ वाजता माझे मोबाईल फोनवर माझे A/C NO ६८००९५०६१०४ मधून ५०००० रुपये प्रमाणे दोन वेळेस काढले बाबत मॅसेज आलेला आहे त्यानंतर मला माझी फसवणुक झाली आहे बाबत लक्षात आल्याने मी सदर अकाउंट मधील उर्वरित रक्कम ATM द्वारे तसेच पत्नी च्या अकाऊन्टला टाकुन दिले व ATM कार्ड ब्लॉक करणे बाबत बँकेला अर्ज दिला व ATM कार्ड ब्लॉक करुन घेतले. त्यानंतर देखील माझे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अमळनेर चे A/C NO ६०३३२५६६८५६ मधुन दि. ३१/०१/२०२२ रोजी ५०००० रुपये प्रमाणे दोन वेळेस काढले बाबत मँसेज आला व दि. ०१/०२/२०२२ रोजी ५०००० रुपये प्रमाणे दोन वेळेस काढले बाबत मँसेज आला आहे असे एकुण ३००००० रुपये ऑन लाईन काढुन माझी फसवणुक झालेली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि जयपाल हिरे करीत आहे.