जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी, ता. यावल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक/युवतींसाठी रविवार, दि. २० जून, २०२१ रोजी करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत करण्यात आलेले आहे.
या मार्गदर्शन सत्रात संदीप पाटील, संस्थापक सचिव, स्वयंदीप प्रतिष्ठान, डांभूर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिट वर करण्यात आलेले आहे. गुगल मिट लिंक https://meet.google.com/Kqm-qrop-hvv याप्रमाणे आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी या मार्गदर्शन सत्रात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजपाल म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.















