जळगाव (प्रतिनिधी) तेरापंथ धर्मसंघाचे नववे आचार्य व युगप्रवर्तक आचार्य तुलसी यांच्या अधिपत्याखाली “अणुव्रत आंदोलन” या संस्थेची प्रतिनिधी संस्था “अणुव्रत विश्वभारती राजसमंद” द्वारा “अणुव्रत क्रिएटिविटी” स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
यात इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गायन, चित्रकला, वक्तृत्व, काव्य व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. वरील सर्व स्पर्धांचे विषय “वर्तमान वैश्विक संकट प्रभाव समाधान व संधी” असा असून यात पहिला गट- तिसरी ते पाचवी, दुसरा गट- सहावी ते आठवी, तिसरा गट-नववी ते बारावी, असा असून शहर व तालुकास्तरीय निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रथम तीन क्रमांकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वरील सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करुन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन अणुव्रत क्रिएटिवीटी स्पर्धेचे विभागीय संयोजक विजय मोतिराम बागुल नवापुर यांनी केले आहे. वरील सर्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेबसाईट www.anuvibha.org/acc व अँप Anuvart Contest २०२० लाॅच करण्यात आले आहे. तसेच नोरथ जोन सयोजिका व खान्देश विभागीय संयोजिका डॉ. ममता बुचा (जळगाव) ०९८२२८३५३०५ यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाईन नंबर ९११६६३४५१४ देण्यात आला आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अधिक विभागीय संयोजक हरिष तरुण बुच्चा जळगाव यांच्या मोबाईल क्रमांक ९०२१३८३५४९ यावर संपर्क साधावा.