जळगाव (प्रतिनिधी) रशिया- युक्रेन मध्ये सुरू असलेले युद्व त्वरित थांबावे व पूर्ण विश्वात शांतता नांदावी यासाठी मुस्लिम समुदायाने विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते. व प्रार्थना झाल्यानंतर मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाच मागण्याचे निवेदन देण्यात आले.
प्रार्थना – श्रद्धांजली व निषेध
सर्वप्रथम विश्वशांतीसाठी अल्लाकडे प्रार्थना करण्यात आली त्यानंतर युद्धात मरण पावलेल्या नवीन शेखर आप्पा या विद्यार्थ्यास श्रद्धांजली अर्पण करून त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
राष्ट्रपति व पंतप्रधान यांना निवेदन
निवेदनातील मागण्या
१) युक्रेन मध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन शंकरअप्पा या विद्यार्थ्यास रशियन सरकारने आर्थिक मदत द्यावी
२) यूक्रेन मधून परत आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात त्वरित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश द्यावा
३) केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विद्यार्थ्यां बाबत जे वक्तव्य केले की नीट नापास झालेले विद्यार्थी हे प्रदेशात वैद्यकिय शिक्षण घेण्यास जातात त्या वक्तव्या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांची व पालकांची माफी मागावी
४) युक्रेन शहराच्या शाळा, दवाखाने ,नागरी वस्ती व सरकारी इमारतीवर होत असलेले बॉम्ब हल्ले त्वरित थांबवावे
५) रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी तिसऱ्या युद्धाची शक्यता वर्तविली आहे त्या शक्यतेला आळा घालण्यासाठी भारताने विशेष प्रयत्न करावे व तिसऱ्या महायुद्धापासून जगाला प्रवृत्त करावे
अशा पाच मागण्याचे निवेदन निवासी उप जिल्हाअधिकारी राहुल पाटिल यांना मज़हर खान यांच्या हस्ते देण्यात आले
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मझहर खान, जामा मस्जिद ट्रस्टचे सय्यद चाँद, अमन एज्युकेशन सोसायटीचे सय्यद शाहीद,ह्युमन राईट असोसिएशनचे अन्वर खान व जावेद खान, नशिराबाद एमआयएम चे फ़जल कासार, खाटीक बिरादरीचे जुबेर खाटीक, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आवेश खाटीक, मन्यार बिरादरीचे रफिक शेख ,अल्ताफ शेख, जुनकर नैन, अमीर शेख, हारून महेबूब, सलीम मोहम्मद, आदींची उपस्थिती होती.