जळगाव (प्रतिनिधी) महसूल विभागाची महापालिकेकडे जवळपास १३-१४ कोटींची थकबाकी असल्याने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचे आदेश बँकांना देण्यात आले असल्याचे कळते.
जळगाव महापालिकेकडे जवळपास १३ ते १४ कोटींची महसूलची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी महापालिकेची बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी वृत्तास दुजोरा दिला असून खाते गोठविण्यात आले की नाही हे बँकेने अद्याप कळविले नसल्याचे धोडमीसे यांनी सांगितले.