धरणगाव(प्रतिनिधीं) : धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एम एच चौधरी होते. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, श्रीफळ फोडून माल्यार्पण मुख्याध्यापक एम एच चौधरी यांनी केले.
इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील मुला-मुलींनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन घेतला तर इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी धावणे पाळणे गोळा फेक भालाफेक यासारख्या खेळांच्या स्पर्धांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी जवळपास ४० मुला-मुलींनी स्पर्धांमध्ये सहभागी झालेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए के पाटील, आर बी महाले, बी आर महाजन, एच आर महाजन, डी बी महाजन, के आर महाजन, ए ए पाटील, कल्पेश वारुळे, सोमनाथ महाजन, किरण महाजन, बाळकृष्ण सुतार, दिलीप चव्हाण, प्रकाश माळी आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी महाले यांनी केले तर आभार कल्पेश महाजन यांनी मानले.