नशिराबाद, ता. जळगाव | वार्ताहर येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराची आळी येथे अखंड हरिनाम किर्तन व राज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहास दि. २ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत असून दि.९ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे.
ह.भ.प. सुनिल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सकाळी ७ ते ७.३० श्री विष्णुसहस्रनाम, प्रार्थना व पसायदान, सकाळी ७.३० ते ११ श्री ज्ञानेश्वरी पारायण, व रात्री ८ ते १० किर्तन. किर्तन सप्ताहात दि. २ रोजी ह.भ.प. प्रभाकर महाराज नशिराबादकर, दि.३ ह.भ.प. सुजीत महाराज जळगावकर, दि.४ ह.भ.प. सुधाकर महाराज बेलव्हायकर, दि.५ ह.भ.प. जितेश महाराज म्हसावदकर, दि. ६ ह.भ.प. गजानन महाराज चौगावकर, दि.७ ह.भ.प. अनिल महाराज धरणगाव, दि.८ ह.भ.प. सदानंद महाराज
धामणगावबडे, दि. ९ रोजी ह.भ.प. सुनील महाराज नशिराबादकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ यावेळेत होईल.
या सप्ताहास मृदुंगाचार्य ह.भ.प.प्रमोद महाराज, मानमोडीकर, संजय महाराज, नशिराबाद. गायनाचार्य रमेश पाटील, पंकज महाराज, मानमोडीकर, सुजित महाराज, जळगावकर. ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह.भ.प. सुनिल महाराज, नशिराबादकर, काकड आरती सेवेकरी सुरेश तुकाराम माळी, मधुकर बाबुराव माळी, दगडू दत्तात्रय माळी यांची साथसंगत लाभणार आहे. तर विशेष सहकार्य संघर्ष मित्र मंडळ, जय महाकाली मित्र मंडळ, , झुंजार परिधार, आदिमाय मित्र मंडळ, संग्राम मित्र मंडळ, संत सावता मित्र मंडळ, मरीआई मित्र मंडळ, महाजनवाडा मित्र मंडळ, दत्त मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. तरी सप्ताहातील सर्व कार्यक्रमांना ग्रामवासियांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजक समस्त माळी पंच मंडळ, वरची आळी यांनी केले आहे.