जळगाव (प्रतिनिधी) पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१०, ११, १२ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ मैदान याठिकाणी पत्रकार प्रीमियर लीग आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा जिल्हाभरातील पत्रकारांना एकत्र करून खेळली जाणार आहे. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांचा एक संघ असणार आहे.
आयोजक वाल्मिक जोशी, किशोर पाटील, चेतन वाणी, वसीम खान, सचिन गोसावी, जकी अहमद यांच्याकडून पत्रकार प्रीमियर लीगबाबत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांचे १४, जळगाव शहरातील ५, संपादक असे एकूण २० तर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाचा संघ असे २४ संघ सहभागी होणार आहे. ३ दिवसीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. समारोप सोहळ्यात ट्रॉफीसह हजारो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत