TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सकडे; कृषी क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प – अनिल जैन

vijay waghmare by vijay waghmare
March 8, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. त्या दृष्टीने सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प दूरदृष्टीचा असून कृषी विकासाला चालना देणारा असल्याचे मत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले आहे.

या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राचा जीडीपी सन २०४७ पर्यंत सध्याच्या सुमारे ५५ अब्ज डॉलरवरून ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

आजच्या काळात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य झाला आहे. जैन इरिगेशनसारख्या संस्थांनी शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सिंचन व कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. शासनानेही कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुमारे २५ टक्क्यांनी कमी होऊन उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १० ते १५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी उभारणे, कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणे, पाच लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणे, स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांपर्यंत “वसुधा मेसेज” सेवा पोहोचवणे, तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये एआय सेंटर स्थापन करणे हे निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहेत. हे निर्णय महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे नेणारे ठरतील, असेही जैन यांनी सांगितले.

यासोबतच शासनाने “अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णयही सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या निर्णयांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल. एकंदरीत, हा अर्थसंकल्प आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि थेट आर्थिक मदत या त्रिसूत्रीवर आधारित असून कृषी क्षेत्राचा कायापालट करणारा परिपूर्ण आराखडा असल्याचे मत अनिल जैन यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : देशात दोन रुपयांच्या बनावट नोटा सर्वाधिक चलनात !

October 2, 2020

पाचोरा, भडगावसह चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस !

April 16, 2023

“… तर १००० कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी” : संजय राऊत

December 20, 2020

जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर मीटरसाठी डीपीआर सादर करणार !

January 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group