चोपडा( प्रतिनिधी) तालुक्यातील मितावली येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्पातील शेती शाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री.जाधवर यांनी कापूस पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व माती परीक्षण करून खतांच्या मात्रा देणे याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी डी.बी. साळुंखे यांनी एक रुपयात पिक विमा बाबत मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांनी पिक विमा काढण्याचेआवाहन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी जे.यु. सोनवणे, कृषी पर्यवेक्षक जे.व्ही. सनेर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन के एच महाजन यांनी केले तर आर एस निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.