असोदा (प्रतिनिधी) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. संस्थाध्यक्ष विलासदादा चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
ज्येष्ठ शिक्षिका उषा नेमाडे यांनी सरदार वल्लभभाई यांच्या जीवनावर आधारीत गीत सादर केले. फाल्गुनी कोल्हे, आदिती कोल्हे, भाग्यश्री नारखेडे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल, एल. जे.पाटील, पी. जे. बऱ्हाटे, यांनी सरदार वल्लभभाई यांच्या जीवनातील घडामोडी सांगितल्या. सचिन जंगले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली. आभार मंगला नारखेडे यांनी मानले.