जळगाव (प्रतिनिधी) कोरोना संकटात रुग्णांसाठी रक्तसाठा तसेच प्लाझ्मा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावा यासाठी भाजपा मुक्ताईनगर व युवा मोर्चा मुक्ताईनगर यांच्यावतीने गोदावरी मंगल कार्यालय मुक्ताईनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जावरे, जि.प.समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, भाजयुमो मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगराध्यक्षा नजमाताई तडवी, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक मुकेश वानखेडे, सालबर्डी माजी सरपंच तुषार राणे, सालबर्डी उपसरपंच शंकर जंगले, तालुका सरचिटणीस सोमनाथ पाटील, विनोद पाटील, सचिन पाटील, कैलास वंजारी, डॉ. पवन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.