जळगाव (प्रतिनिधी) दरवर्षी २२ मे हा “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना “आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत” (We are part of solution # for nature) ही आहे. जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन तसेच जैवविविधतेची माहिती जनमाणसात व्हावी. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थानी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. स्पर्धेकाने आपल्या प्रवेशिका ईमेलवर २२ मे, २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावी. असे प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
चित्रकला/स्केच/पेटिंग स्पर्धा – वयोगट पाचवी ते आठवी (A४ & A३ Size) विषय – माझी आई, माझी वसुंधरा (My Mother, My earth) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक ३ हजार रुपये द्वितीय क्रमांक २ हजार रुपये तर तृतीय क्रमांक १ हजार रुपये. चित्र msbb.ngpdrawingjunior@gmail,com या ईमेलवर पाठवावे.
पोस्टर स्पर्धा – वयोगट नववी ते बारावी (A४ & A३ Size) विषय – माझे आवडते प्राणी (पशु/ पक्षी) व कारणे (My favorite animal & why) (birds, animals) रक्कम प्रथम क्रमांक ३ हजार रुपये द्वितीय क्रमांक २ हजार रुपये तर तृतीय क्रमांक १ हजार रुपये. पोस्टर msbb.ngpdrawingsenior@gmail,com या ईमेलवर पाठवावे.
निबंध स्पर्धा – वयोगट पदवीधर व पदव्युत्तर, विषय- जैविक संसाधने हे कोविड -१९ समाधान आहे का? (होय/ नाही) (Biological conservation os a solution towards pandemic of covid-19) (for & against) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक ४ हजार रुपये द्वितीय क्रमांक २ हजार रुपये तर तृतीय क्रमांक १ हजार रुपये. निबंध msbb.ngpeassy@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी स्पर्धा- वयोगट खुला गट (video Clips for 2-3 Minutes) विषय – वन्यप्राणी हालचाल (पोहतांना/धावतांना/पाणी पितांना/शिकार करतांना) (Wild animal action) (Swimming/ running/chasing/hunting) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक ७ हजार रुपये द्वितीय क्रमांक ५ हजार रुपये तर तृतीय क्रमांक ३ हजार रुपये. फोटो msbb.ngpphoto@gmail.com या ईमेलवर पाठवावे.
स्पर्धेकांसाठी अटी व शर्ती – स्पर्धेक हा भारतीय असावा, विषय महाराष्ट्र जैवविविधता संवर्ध़़नाशी निगडीत असावा, निबंध स्पर्धेतील शब्दाची मर्यादा पदवीधर व पदव्युतर, पीएचडी धारकांकरिता ८०० ते १००० शब्द राहील, निबंध तपासतांना विषयाचे ज्ञान, विश्लेषण, मांडणी, शुध्दलेखन व हस्ताक्षर विचारात घेण्यात येईल. निबंधांना ५ सेंमी मार्जिन असावी, चित्रकला/ पोस्टर स्पर्धेकरिता चित्राचा आकार 33×50 किंवा 50×70 से.मी . राहील, चित्रकला/पोस्टरचे स्कॅन करुन पीडीएफ फाईल तयार करावी व दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवावे. चित्रासाठी कोणतेही माध्यम वापरले तरी चालेल, हार्ड कॉपी स्विकारल्या जाणार नाही. नाविन्यपूर्ण बाबींना प्राधान्य दिले जाईल, व्यावसायिक छायाचित्रकाराला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. फक्त विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरीक यांनाच सहभाग घेता येईल, वनविभाग व वनविभागातील संलग्न विभागातील (वनविकास महामंडळ/वन्यजीव/सामाजीक वनीकरण/मंडळ इ.) कर्मचारी/अधिकारी यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. व्हिडीओ क्लिप्स मूल संकल्पनेशी संबंधित असावे, स्पर्धा व पारितोषिकासंबंधी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचा निर्णय अंतीम राहील. एकदा निकाल घोषित झाल्यानंतर त्याबाबत तक्रार स्वीकारली जाणार नाही,
सदस्य चमुकडुन प्रवेशिकेची तपासणी करण्यात येईल. तपासणी समितीतील प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ-1, प्राधापक/अध्यापक महाविद्यालयीन प्रतिनिधी-1, वनविभाग/सामाजिक वनीकरण विभाग/ शासकीय अधिकारी-1 असे राहतील.
स्पर्धेकाने ऑनलाईन प्रवेशिकेच्या वेळी स्व:हस्ताक्षरात सहमती पत्र देऊन त्यामध्ये सविस्तर नाव/पता/जन्मतारिख/ईमेल/दुरध्वनी क्रमांक/आधारकार्ड व शैक्षणिक संस्थेचे नाव अंतर्भुत करावे, स्पर्धेकाने प्रपत्रात स्व:हस्ताक्षरात माहिती भरावी किंवा टंकलेखीत करावे व ऑनलाईन प्रवेशिकेच्यावेळी सादर करावी. नाव, लिंग, जन्मतारिख, रहिवासी पत्ता, शाळा/महाविदयालय/विद्यापीठ/संस्थेचे नाव, आधारकार्ड क्रमांक, फोनक्रमांक, ईमेल आयडी, सही केलेले छायाचित्र आदि माहिती असावी. स्पर्धेचा निकाल जुन, २०२१ च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाच्या www.mahaforest.gov.in या वेबसाईटवर घोषित करण्यात येईल व विजेत्यांना दिलेल्या ईमेलवर माहिती पाठविण्यात येईल. असेही प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.