जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयात २६ नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून प्रशासनाच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर हा कालावधी हुंडाबंदी सप्ताह म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधुन हुंडाबंदी दिनाची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी होण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने वैयक्तिक कृती व्दारे सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यामध्ये हुंडा एक सामाजिक समस्या या विषयावर निबंध स्पर्धा, हुंडाबंदी दिन या विषयावर वकृत्व स्पर्धा घेणे (वैयक्तीक) ३ ते ५ मिनीटांचा व्हिडीओ तयार करुन पाठवणे, हुंडाबंदी या विषयावर कविता/लेखन पाठविणे, हुडाबंदी या विषयावर घोषवाक्य तयार करणे, हुंडाबंदी या विषयावर चित्र काढणे, २६ नोव्हेंबर या हुंडाबंदी दिनानिमित्त प्रतिज्ञा तयार करणे. या सर्व वैयक्तीक कृती करुन खाली दिलेल्या मेलवर व तालुकानिहाय व्हॅटसअप नंबरवर स्पर्धकाचे नाव, पत्त्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व मेलसह पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकाच कृतीचा फोटो सादर करता येईल. आरती साळुंके, जळगाव शहर-९४०३९७८८, महेंद्र बेलदार, जळगाव ग्रामीण-८६९३८७५६५६ , प्रतिक पाटील, भुसावळ / बोदवड- ९८८११६९३३३, योगिता चौधरी, अमळनेर- ९८६००९१९४३, रिटा भंगाळे, चोपडा-९९७०४५७३२, चंद्रशेखर सपकाळे, धरणगाव-९८९००९१९४३, मिलींद जगताप, रावेर-९८२२२१८६५१, विशाल ठोसर, जामनेर- ८८०५१२३३०२, राजु बागुल, पारोळा-९८९३१९०८६७, उर्मिला बच्छाव, एरंडोल- ८९८३१३७६३१, प्रशांत तायडे, मुक्ताईनगर-९४२१७०८२९२, सुदर्शन पाटील, भडगाव/चाळीसगाव-७५८८६४६६९०, आशिष पवार, पाचोरा-७८७५२०२५८१ वैयक्तिक कृती पाठविण्याचा कार्यालयाचा ई मेल dwcwjal@gmail.com असा आहे.
चांगल्या वैयक्तीक कृती ची प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक निवड करुन जिल्हा व तालुका प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येईल. सर्व कृती ही वैयक्तिक स्वरुपाची असुन कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेवून मास्क लावणे व सामाजिक अंतर आदि मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनीएका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.