मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि शिंदे गटाचा धुव्वा उडविला. तर मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील १३ ग्रामपंचायती पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व माझ्यावर मतदारांनी विश्वास दाखवल्याचं एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.
कुऱ्हा येथे राष्ट्रवादी डॉ. बी सी महाजन यांनी भाजपा चे भागवत दगडू राठोड यांचा १हजार १७९ मतांनी पराभव करून राष्ट्रवादी चे वर्चस्वावर शिक्का मोर्तब केले.तर खडसें च्या प्रभावाने भाजपचा गड ठरलेला कुऱ्हा आता खडसे राष्ट्रवादीत गेल्याने राष्ट्रवादीमय झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर होत नाही.हे खरं असलं तरी राजकीय पक्षांचा प्रभाव मात्र निवडणुकीवर असतो अशात कुऱ्हा परिसर राजकीय संवेदनशील भाजपचा गड असलेल्या याठिकाणी अशात प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटीबाचावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी निवडणूक सक्रिय पणे हाताळली.
अगदी आ.मंगेश चव्हाण यांना सभा घ्यायला लावली. तर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कॉर्नर सभा प्रचार रॅली करून भाजप आणि शिंदे गटाने कुऱ्हा पिंजून काढला होता. तर दुसरी कडे राष्ट्रवादीपक्षा कडून आ.एकनाथ खडसे व आ.अमोल मिटकरी यांची सभा घेतली. मात्र, मतदारांनी सरपंच पद पाठोपाठ १७ जागा पैकी १३ जागा ही राष्ट्रवादीच्या झोळीत टाकल्या. तीन जागा शिंदे गटाच्या आल्या. तर भाजपची फक्त एक जागा निवडून आली. तालुक्यातील उचंदे ग्राप निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात १३ पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे यांच्यावर विश्वास दाखविलेला आहे.
नाथाभाऊ संपले अशी आवई उठवली
मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचा आमदार असून एकाही ग्रामपंचायतीवर शिंदे सेनेचा झेंडा फडकला नाही. मतदारांनी शिंदे सेनेला नाकारलेला आहे. दूध संघामध्ये आमच्या पॅनलचा पराभव झाला म्हणून नाथाभाऊ संपले अशी आवई उठवली जात होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. जनतेतून निवडून आलेले हे सरपंच आहेत यामध्ये सहा ते सात ग्रामपंचायती मोठ्या आहेत. त्यामुळे हे सिद्ध झाले की मुक्ताईनगर मधील मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.