TheClearNews.Com
Wednesday, May 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ

पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

vijay waghmare by vijay waghmare
March 30, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ ज्योती जैन, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर आणि शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाला. प्रीती झारे यांचे वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन यामुळे जळगावकर रसिकांचा या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

मराठी नववर्षाच्या निमित्ताने शहरातील गांधी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ कार्यक्रमाची सुरुवात ‘ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या…’ ऐश्वर्या परदेसी यांच्या गाण्याने झाली. यानंतर भूपाळी या प्रकाराच्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले, यात ‘प्रभाती सुर नभी रंगले …’ ‘मलयागिरीचा चंदन गंधित धूप तुला दावीला उठी उठी गोपाळा…’ हे ‘देव दिनाघरी धावला’ या नाटकाचे पद सादर करण्यात आले. त्यानंतर श्रीरामाचे गीत ‘उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली’ या पदाने रसिकांकडून दाद मिळाली. भूपाळी मेलडी प्रकारात
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला…’ ही सुप्रसिद्ध रचना किरण सोहळे यांनी विशिष्ट शैलीमध्ये गायली. ‘विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे..’, पांडुरंग नामे लागलासी ध्यास ही रचना श्रुती जोशी यांनी सादर केली. यावर्षी मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्याच्या औचित्याने गाण्याच्या माध्यमातून भाषेचा गौरव सांगणारे गाणे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ हे गीत रचना सादर करण्यात आली. . ऐश्वर्या व श्रुती यांनी ‘धन राणी धन राणी साजना…’ हे गाणे सादर केले. यानंतर भवानी देवीचा गोंधळ सादर करण्यात आला. ऐश्वर्याने कविवर्य स्वर्गीय ना. धो. महानोर यांची रचलेली लावणी ‘राजसा जवळ जरा बसा..’ सादर केली. कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर अपर्णा भट कासार यांच्या प्रभाकर संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी नृत्य अविष्कार सादर करून केला. ‘उत्तुंग भरारी घेऊया… मी मराठी मी मराठी…’ तसेच बहिणाबाई चौधरी यांची रचना ‘माझी माय सरस्वती माले शिकवते बोली…’ या गाण्यांवर नृत्य अविष्कार सादर झाला आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. आपल्या नृत्याच्या अविष्काराबद्दल नृत्य कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालविणाऱ्यांवर होणार मकोकातंर्गत कारवाई

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

नववर्षाची इतकी चांगली सुरुवात करून दिलेल्या या कार्यक्रमाच्या कलाकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात गायिका श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेसी आणि किरण सोहळे यांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी वादक म्हणून लाभलेले राजेंद्र माने (हार्मोनियम), राहुल कासार (तबला), दर्शन गुजराती (पखवाज) यांचा सत्कार करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती झारे यांनी केले आभार प्रदर्शन नुपूर खटावकर चांदोरकर यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालविणाऱ्यांवर होणार मकोकातंर्गत कारवाई

May 27, 2026
गुन्हे

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

May 27, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 मे 2026 !

May 27, 2026
गुन्हे

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026
गुन्हे

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

May 26, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Tips On How To Play Leovegas Casino Complete Information Gamblingbaba

August 11, 2022

जळगाव : मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नीला दिला गळफास ; पती स्वतःहून झाला पोलिसात हजर !

October 1, 2022

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, सोमवार १३ जून २०२२ !

June 13, 2022

धक्कादायक : कुत्रा चावला तरी केलं दुर्लक्ष, अखेर ८ महिन्यांनी प्रौढासोबत असं घडलं की वाचून हादराल !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group