धुळे (प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय मुलीला मध्यरात्री चौघांनी उचलून शेतात नेत दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्यांसह मदत करणारे आणि बघ्याची भूमिका घेणारा, अशा एकूण पाच जणांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी मध्यरात्री नैसर्गिक विधीसाठी उठली होती. या वेळी किशोर पंडित सूर्यवंशी, छोटू उर्फ प्रशांत रतीलाल बागुल, चेतन भटू बागुल, संदेश रामदास साबळेयांनी मुलीचे तोंडू दाबून तिला उचलून शेतात नेले. त्यानंतर शेतातील विहिरीजवळ असलेल्या झाडाजवळ प्रशांत व चेतन बागुल यांनी मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी किशोर व संदेश यांनी मुलीला पकडून ठेवले होते. दरम्यान, पीडिता प्रतिकार करत असताना तिचा आवाज ऐकून जयेश नेहरू सूर्यवंशी हा तेथे आला होता. परंतू चौघांना विरोध न करता तो तेथून निघून गेला. पीडितेने कुटुंबाला माहिती दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून साक्री पोलिस ठाण्यात विविध कलमांसह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्यात आली आहे.