TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मान्सुन काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जिवीत व वित्त हानी टाळण्याकरीता सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, मान्सुन काळात उद्भवणाऱ्या विज, अतिवृष्टी, पूर, महापूर, दरड कोसळणे इत्यादि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची पूर्वतयारी करणे आवश्यक असून यामुळे आपत्कालीन काळात होणारी जिवीत व वित्त हानी टाळणे शक्य होईल. यासाठी सर्व यंत्रणानी सज्जता ठेवावी तसेच विभाग निहाय आराखडे SOP अद्यावत करावे, विभाग निहाय नियंत्रण कशाची स्थापना करावी व 24×7 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करावी, आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची तपासणी करून सर्व साहित्य सज्ज ठेवावे. सर्व विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवावा व येणार्‍या संभाव्य आपत्तीचा समर्थ पणे मुकाबला करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शपंकज आसिया, पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग, सर्व प्रांत अधिकारी,सर्व तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी पोलीस व होमगार्ड विभाग, उप प्रादेशिक परिवहन विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभाग इत्यादि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्य़ातील तापी, गिरणा, वागुर या प्रमुख नदी काठच्या गावांबाबत प्राधान्याने सतर्क राहावे. छोटे नाले, ओढे, नद्या, यांना अचानक येणाऱ्या पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहिल याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे/मोठे पुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी चोवीस तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पूरप्रणव क्षेत्र/गावे याबाबत लाल व निळ्या गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तात्काळ काढण्यात यावीत.

हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेचे उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यत माहिती पोहोचवावी. तसेच राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती करुन घ्यावी. महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, ड्रेनेज, पाईपलाईन दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी. धोकादायक व अनधिकृत होर्डिग ताबडतोब काढावेत इत्यादि सुचना देण्यात आल्या.

बैठकीत पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांनी सादरीकरण केले. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. नायब तहसीलदार अमित भोईटे, महसूल सहायक सुनील पवार, मोहनीश बैंडाळे यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

धरणगावात ना. गुलाबराव पाटलांच्या उपस्थित महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट !

June 7, 2021

लग्न लावून देण्याच्या नावाखाली एकाची १ लाख ७० हजारात फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

May 11, 2022

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

November 15, 2020

खुशखबर !… एमपीएससीच्या परीक्षा मार्चमध्ये, आता तयारीला लागा

January 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group