सावदा ता.रावेर (प्रतिनिधी) परिसरातील एका गावात चॉकलेटच्या बहाण्याने दुकानात बोलवून १० वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, १ मे रोजी रात्री पावणे आठ ते साडेआठच्या दरम्यान, प्रदीप सुका कोळी याने पिडीत मुलीस घरी कोणी नसताना त्याच्या दुकानात बोलावून घेतले. यानंतर तीला चॉकलेट देत तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासी पोउपनिरी अन्वर तडवी हे करीत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी प्रदीप कोळी याला अटक केली आहे.