पाचोरा (प्रतिनिधी) शालेय सुट्टीमध्ये आजीकडे आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत चुलतभाऊने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शालेय सुट्ट्या असल्याने पिडीता आपल्या आजीच्या घरी आली होती. दिनांक ५ मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास या भावाने अल्पवयीन चुलत बहिण झोपलेली असतांना तिच्यासोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भेदरून पिडीता जागी झाल्याने तिने विरोध केला असता आरोपीने गळा दाबून जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केळा. या प्रकरणी चुलत भाऊ विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोस्को अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.