पारोळा (प्रतिनिधी) एरंडोल येथील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील ६ ते ७ महिन्या पासून सुरु असलेल्या अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघं संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. बारकु उर्फ प्रविण बाळू पाटील, पप्पु उर्फ शुभम बापू पाटील (दोघे रा. सावखेडा तुर्क ता. पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (रा. सावखेडा होळ ता. पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
या संदर्भात पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिडीता पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात कामाला जात होती, त्या-त्या शेतात कामाला जाऊन बारकु उर्फ प्रविण पाटील (वय २३), पप्पु तुर्क उर्फ शुभम बापु पाटील (वय २३) पप्पू उर्फ भावश्या भाऊसाहेब वसंत पाटील(वय २५) यांनी पिडीतेशी जवळीक साधली, त्यानंतर शेतातच वेगवेगळ्या ठिकाणी नेत कधी एक जण तर कधी दोघे असे शारीरीक संबंध ठेवत होते. तसेच पिडीतेला धमकी द्यायचे की, हे कोणाला सांगू नको नाहीतर तुझा व्हीडीओ आम्ही केलेला आहे. तो व्हीडीओ सर्वांना दाखवुन तूझी बदनामी करू, अशी धमकी भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील हा देत होता.
सदरचे कृत्य हे ६ ते ७ हे महिण्यापासून चालू होते. त्यामुळे पिडीतेचे पोटात ७ ते ८ दिवसापासून दुखत होते. त्यामुळे तिने तिच्या आईला सांगीतले. त्यानंतर पिडीतेच्या आईने एरंडोल येथील एका खाजगी डॉक्टरकडे दि. ११ एप्रिल रोजी तपासणी असता पिडीता ही १६ आठवड्याची गर्भवती असल्याचे सांगत तसे लेखी सर्टीफिकेट दिले. दरम्यान, या प्रकरणी पारोळा पोलिसांनी पोस्को, अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत तिघां संशयित आरोपींना अटक केली आहे. तर पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.