पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलावर गावातीलच एका युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचोरास पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
२५ जुलै रोजी रात्री आठ वाजता पीडित मुलाचे आई-वडील शेतीची कामे आपण घरी आले असता मुलगा घरी नसल्याने शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेतांना कळाले की, मुलगा गावातीलच गोलू (उर्फ) ज्ञानेश्वर दिनकर महाजन यांच्यासोबत आहे. आई-वडील हे गोलू महाजन यांच्या घरी गेले तेव्हा त्याचा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पिडीत मुलाच्या परिवाराने गोलूच्या घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्यांना धक्का बसला आहे.
यानंतर पिडीत अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला संशयित आरोपी गोलू उर्फ ज्ञानेश्वर दिनकर महाजन याच्या विरोधात पोस्को एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनिरीक्षक योगेश गनगे हे करीत आहेत.