पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) बिस्कीट पुडा घेऊन देण्याच्या बहाण्याने एका ७ वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
पहूर परिसरातील एका गावात दि. २५ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरेश शांताराम भोई (वय ३९) याने पिडीत ७ वर्षीय बालकाला बिस्कीट पुडा घेऊन देण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. त्यानंतर घरात त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकरणी सुरेश भोई विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि दिलीप पाटील हे करीत आहेत. संशयित आरोपी सुरेश भोई यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे समाजमनात संतापाची लाट उसळली आहे.