धरणगाव (प्रतिनिधी) पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या श्री बालाजी मंडळाच्या चंद्राच्या वाहनाचे सारथ्य पहिल्यांदाच पी.आर.हायस्कूलच्या मुलींना देऊन १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्री शक्तीचा गौरव केला.
इतिहासात प्रथमच पी.आर.हायस्कूलच्या नावाने माजी विद्यार्थ्यांनी घेतले वाहनाचे प्रायोजकत्व
धरणगावच्या इतिहासात प्रथमच पी.आर.हायस्कूलच्या नावाने माजी विद्यार्थ्यांनी श्री बालाजी वाहन मंडळाच्या चंद्राच्या वाहनाचे प्रायोजकत्व घेतले. धरणगावच्या या लोकोत्सवात वाहनाचे सारथ्य प्रामुख्याने पुरुष मंडळींकडेच असते पण शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी या वर्षी मुलींना सारथ्य देऊन नवा पायंडा पाडला. शाळेनेही या उज्ज्वल परंपरेचे स्वागत केले. या वाहनाच्या मिरवणुकीत मुलींच्या लेझीम पथकाने नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर मुलांचे ढोल पथक विशेष आकर्षण ठरले. यावेळी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ अरूण कुलकर्णी, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ,पर्यवेक्षक कैलास वाघ यांचा बालाजी वाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विविध क्षेत्रात काम करणारे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी
शाळेचे माजी विद्यार्थी तथा विक्रीकर आयुक्त विशाल मकवाने, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष निलेश बयस, उपाध्यक्ष चंदन दिलीप पाटील, प्रा.रवींद्र मराठे, ज्ञानेश्वर चौधरी, दिपक केले, सुशील कोठारी आणि १९९७ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे बालाजी मंडळाला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उद्योजक नयन गुजराथी यांच्या हस्ते लेझीम पथकाचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. लेझीम व ढोल पथकासाठी क्रीडा शिक्षक मनोज परदेशी यांनी मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ, उमाकांत बोरसे, एनसीसी मेजर डी.एस.पाटील यांच्या सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तर युवराज पाटील, सचिन पाटील, मंजुषा राजपूत, पुनम अहिरराव, कीर्ती कुमार महाजन, श्रीपाद पांडे ,धीरज पवार, भटू पवार ,शेख अफसर, भटू पाटील, सपना बयास, महेश सुर्यवंशी, अल्पेश अमृतकर हे विविध क्षेत्रात काम करणारे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.