पाचोरा (प्रतिनिधी) मोबाइल घेऊन न दिल्यामुळे सहावीत शिकणाऱ्या मुलाने, शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दि. ६ रोजी सायंकाळी सातगाव डोंगरी येथे ही दुर्दैवी घटना घडली. ऋषिकेश संतोष आवारे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
मृत ऋषिकेश याच्या मोठ्या भावाला वडीलांनी मोबाईल घेऊन दिला होता. त्यामुळे ऋषिकेश यानेही मोबाइल घेऊन देण्याचा आग्रह धरला होता. मात्र वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने ते मोबाइल घेऊन देऊ शकले नाहीत. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचल्याची गावात चर्चा आहे. घटनेच्या वेळी मृताचे आई-वडील आणि मोठा भाऊ मजुरीसाठी गेले असल्याचे समोर आले आहे.