पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलाने ७ वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावात १५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका शेतात १४ ते १५ वर्षीय मुलाने गावातीलच पहिलीत शिक्षण घेणाऱ्या एका ७ वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक संभोग केला. या संदर्भात पिडीत बालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून १४ ते १५ वर्षीय मुलाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि महेद्र वाघमारे हे करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.