पाचोरा : चारित्र्यावर संशय घेत मध्य प्रदेशातील गोराडखेडा येथे घडली घटना; सांगितला. त्यानंतर चंद्रकांत संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. मजुराने आपल्या पत्न ीचा गळा आवळून खून केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा या गावातील शेत शिवारात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संशयित पतीस पोलिसांनी गावातून ताब्यात घेतले आहे.
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील चंद्रकांत काशिनाथ पाटील यांची गावालगतच शेती आहे. शेती व इतर कामांसाठी पाटील यांच्याकडे मध्य प्रदेशातील भाया ऊर्फ भैय्या शंकर चौहान (रा. कुसम्या, ता. निवाली, जि. बडवानी) हा त्याची पत्नी सयादीबाई चौहान यांच्यासह २ वर्षांपासून कामास आहे. भैय्या चौहान हा नेहमीच त्याची पत्नी सयादीबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणामुळे त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काशिनाथ धोंडू पाटील हे गुरांचे दुध काढण्यासाठी शेतात गेले होते. या वेळी त्यांनी भैय्या चौहान व सयादीबाई राहत असलेल्या गोठा शेडचा दरवाजा वाजवला, परंतु कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काशिनाथ पाटील यांनी त्यांचा मुलगा चंद्रकांत पाटील यास हा प्रकार सांगितला. त्यानंतर चंद्रकांत पाटील व गावातील काही ग्रामस्थ घटनास्थळी आले. त्यांनी गोठा शेडचा दरवाजा उघडला असता सयादीबाई चौहान जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याठिकाणी भैय्या चौहान हा नव्हता. तर सयादीबाई चौहान यांच्या गळ्यावर काळे डाग दिसून आले. दरम्यान, तत्काळ रुग्णवाहिकेस पाचारण करुन सयादीबाई चौहान यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सयादीबाई यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
रुमालाने गळा आवळल्याचे पतीने सांगितले
भैय्या चौहान याचा गावात शोध घेतला असता तो गावात आढळला. या वेळी तो रडु लागला व माझ्या पत्नीचे चारित्र्य व्यवस्थित नाही, असे सांगून मी तिला डोक्याला बांधणाऱ्या रुमालाने मारुन टाकले. तर मला ही जगायचे नाही, असे तो सांगू लागला. दरम्यान, पोलिसांनी संशयित भाया ऊर्फ भैय्या शंकर चौहान यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.