जळगाव (प्रतिनिधी) दहशत माजवण्याच्या उद्देशाने विनापरवाना तलवारी बाळगणाऱ्या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. हर्षल विनोद राजपूत असे (मोहाडी ता. पाचोरा) येथील रहिवासी असलेल्या अटकेतील तरुणाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथील एका तरुणाने दहशत माजवण्याच्या उद्देशाने तीन तलवारी लपवून ठेवल्या आहेत. या तलवारी हर्षल नामक तरुणाने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला त्याने लपवून ठेवलेल्या तिन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपुत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चौबे, सफौ अनिल जाधव, पोहवा नंदलाल पाटील,महेश महाजन, गोरख बागुल, संदिप सावळे, प्रितम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, पोना भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, पो.कॉ. उमेश गोसावी, लोकेश माळी, चापोना अशोक पाटील, चापोकॉ प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.