पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये व सोन्याचे दागिनेही घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, २४ वर्षीय महिलेच्या पतीचा 2020 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला होता. पीडित महिलेचा पती आयटी इंजिनिअर होता. दरम्यान, पतीच्या मुत्युनंतर चुलत दीर आणि सासू,सासऱ्याने फसवणुक करण्याचा कट रचुन संगनमताने महिलेच्या आई वडिलांकडे जावु न देता लग्नाचे आमीष दाखविले. पीडीता लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवु असे सांगत असताना देखील वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवुन चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. तसेच अद्यापपर्यत लग्न केले नाही व लग्नासही नकार दिला. तसेच चुलत सासरे व दिर अशा तिघांनी मिळून महिलेचा विश्वास संपादन केला. दरम्यान, वेगवेगळे बहाने करुन महिलेच्या पतीच्या खात्यातील रक्कम ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये वळती करुन घेतले. एवढेच नाहीतर महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन सज्जनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.
असा केला विश्वास संपादन
पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर पतीच्या निधनानंतर मिळणारी रक्कम बँकेत मिळणार होती. त्यामुळे चुलत दीर हा पीडित महिलेला घेऊन बँकेत जात होता. त्यामुळे त्याला पीडितेला 79 लाख रुपये मिळणार असल्याचे माहीत होते. याची माहिती त्याने आपल्या वडिलांना दिली. त्यानंतर चुलत दीर, सासरे अशा तिघांनी मिळून पिडीतेच्या सासू-सासऱ्यांचा विश्वास संपादन करून आपण दोघांचे लग्न लावून देऊ म्हणून सांगितले. कुटुंबातल्या कुटुंबात पीडितेचा विवाह होत असल्यामुळे सासू-सासर्यांनी संमती भरली. यानंतर दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर येथे कंपनी टाकण्याच्या नावाखाली विवाहितेच्या खात्यातून तब्बल 73 लाख रुपये वळते केले. पैसे आपल्या खात्यात वळते झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पीडितेला घरातून बाहेर काढले. तसेच लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. पीडित आणि पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीच गुन्हा दाखल करून घेतला.