चोपडा (प्रतिनिधी) चोपडा आगाराने पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या निमित्ताने मागील तीन दिवसात चोपडा एसटी डेपोचे उत्पन्न ११ लाखाच्या घरात गेल्याची माहिती, आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी नुकतीच दिली आहे.
विश्वप्रसिध्द प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या बडे जटाधारी मंदिर परिसरात आजपासून सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले होते. चोपडा एसटी डेपोने पहिल्या दिवशी शंभर फेऱ्या पूर्ण केल्यात. तर त्यात सवलतीसह तीन लाख नव्वद हजार रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्या दिवशी ८४ फेऱ्या पूर्ण केल्या यात सवलतीसह जवळपास ३ लाख रुपये उत्पन्न घेण्यात आले. तर तिसऱ्या दिवशी १०० फेऱ्या पूर्ण केल्या यात जवळपास ३ लाख ८० हजार उत्पन्न मिळविले. अशा प्रकारे चोपडा एसटी डेपोने तीन दिवसात एकूण जवळपास ११ लाखाचे उत्पन्न मिळविले.
भाविकांमध्ये महिलाची गर्दी जास्त दिसत असल्यामुळे पुढे ११ तारखेपर्यंत आपण मोठे उत्पन्न घेऊ, अशी आशा आहे. यासाठी आपले वाहक, चालक व आगारातील सर्वच कर्मचारी देखील सहकार्य करत आहे. अशी उत्तम व्यवस्था साठी भाविकांचे देखील चांगले सहकार्य मिळत आहे. उद्या शिवपुराण कथेसाठी जाणाऱ्या सर्व शिवभक्तांकरीता चोपडा आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सर्व भाविकांसाठी पाण्याची बाटली व चिवडा वाटप करण्यात येणार आहे.