बोदवड (प्रतिनिधी) समस्त ब्राम्हण समाज बांधवांचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांची जयंती आज बोदवड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी साडेदहा वाजता शहरातील भगवान परशुराम नगरच्या फलकाचे पूजन करून सजवलेल्या रथात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक शहरातील गांधी चौक, मार्गे सवाद्य काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला मंडळ, कन्या मंडळसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील शर्मा मंगल कार्यालयामध्ये दुपारी बारा वाजता मंगल आरती व प्रसाद वाटप करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळेस समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते. तर सदर कार्यक्रमासाठी समाजातील तरुण मंडळीने परिश्रम घेतले.