TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राऊतांची एक शिवी, गुलाबरावांसह आमदारांवर टीका अन् शिंदे सेना उतरली मैदानात !

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या दोघं उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात एक शिवी दिली. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. शिवीगाळ आणि पालकमंत्र्यांवरील टीका जिव्हारी लागल्यामुळे शिंदे सेना मैदानात उतरल्याचे चित्र महायुतीच्या कालच्या रॅलीतून दिसून आले.

राऊतांच्या भाषणात पाच वेळा शिवराळ शब्दांचा प्रयोग !

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेले खासदार संजय राऊत आले होते. यावेळी झालेल्या सभेत राऊत आपल्या भाषणात म्हणाले होते की, भाजप म्हणजे XXXX पक्ष आहे. जळगाव आणि रावेरातील अशा XXXX ना गाडण्याची जबाबदारी जनतेवर आहे. महाराष्ट्रावर या XXXX नी जो अन्याय अत्याचार केला. त्याचा बदला घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे. अडीचशे खोके घेऊन बसलेले सभेकडे पहाताहेत. सर्वात मोठी गद्दारी जळगाव जिल्ह्यात झाली. या पान टपरी वाल्याला ४ जूननंतर त्याला परत टपरीवर बसवण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे या दोन्ही मराठी माणसांचे पक्ष त्या XXXX का फोडले?, असा असंसदीय शब्द राऊत यांनी आपल्या भाषणात वापरला होता.

राऊतांनी आम्हाला कामाला लावले : गुलाबराव पाटील !

गुरुवारी महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे अर्ज दाखल केल्यानंतर एक सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आपापली भाषणं केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमी शैलीत संजय राऊत यांचा जोरदार समाचार घेतला. गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत ज्या प्रकारे अर्वाच्य भाषेत बोलले, त्यापेक्षा जास्त आम्ही बोलू शकतो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे आम्ही त्या शब्दात बोलणार नाहीत. आतापर्यंत या निवडणुकीत आम्ही शांत होतो. कोण एवढ्या उन्हात बाहेर निघेल, असे म्हणत होतो; पण संजय राऊतांनी आम्हाला कामाला लावले. त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. आता आम्ही पूर्ण क्षमतेने काम करतोय. एवढेच नव्हे तर, संजय राऊत हे आमच्या मतांवर खासदार झाले. संजय राऊतांमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उभे राहून दाखवावे, असे आव्हान देखील गुलाबराव पाटील यांनी राऊतांना दिले.

अन् शिंदे सेना उतरली मैदानात !

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी जाहीर झाल्यापासून रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप आपल्या परीने प्रचाराला लागली होती. परंतू शिंदे गट पाहिजे तसा सक्रीय झालेला नव्हता. विधानसभेतील कटू अनुभवामुळे शिंदे सेना काम करत होती, परंतू निवडणूक अंगात आणत नव्हती. परंतू खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात एक शिवी दिली आणि शिंदे सेना पेटून उठत झपाटून कामाला लागली. राऊतांची शिवी आणि जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांवर केलेली टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यातूनच कुठं तरी शांत असलेल्या शिंदे सेना मैदानात उतरली. त्यामुळे गुरुवारच्या रॅलीत  पाचोरा, भडगाव, अमळनेर, धरणगाव, जळगाव शहर  आणि जळगाव ग्रामीणमधून भाजपसोबत शिंदे सेनेचे शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात दिसून आलेत.

ठाकरे गटाकडून विधानसभेपूर्वीच आक्रमक प्रचाराची रणनीती ?

खासदार संजय राऊत यांनी बुधवारी आपल्या भाषणात शिवराळ भाषा वापरली होती. परंतू शिवसेनेकडून अशाच पद्धतीची आक्रमक प्रचाराची रणनीती आखली गेल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या आमदारांना विधानसभेपूर्वीच आतापासून जेरीस आणायचे, हा देखील ठाकरे गटाच्या रणनीतीचा भाग असू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणूक देखील गद्दारी-खुद्दारी मुद्द्याच्या अवती-भवती फिरावी, जेणे करून भाजपला मोदींच्या नावावर मते मागण्यापासून रोखता येईल आणि राज्यातील भावनिक मुद्द्यांवर प्रचारात भर देता येईल. दुसरीकडे भाजपने देखील शिवराळ भाषा आणि महिलांचा अपमान याच मुद्द्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: gulabrao patilMahavikasaghdi

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात करण पवार यांची विविध गावांमध्ये प्रचार रॅली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : चीनकडून राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांवर पाळत !

September 14, 2020

जोपर्यंत दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही : अब्दुल सत्तार

December 25, 2020

बाबा गावात चोर फिरताय सांगत भामट्यांनी वृद्धाच्या अंगावरील सोने केले लंपास !

June 10, 2024

गांजा बाळगणाऱ्या सारबेट्याच्या दोघांना हेडावे गावाजवळ अटक !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group