पुणे (वृत्तसंस्था) मध्यप्रदेश येथून कांदे काढण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराच्या 12 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळ रविवारी रात्री घडली. संजीव बाशीराम झमरे (रा. टेमला राजपुर, ता. राजपूर, जि. बिडवाणी, मध्यप्रदेश), असे मृत मुलाचे नाव आहे.
बाशीराम जालू झमरे हे त्याच्या कुटुंबासह पांडुरंग ताजने रा आतुर यांच्य शेतात कांदे काढण्यासाठी जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळच्या जाकमाथा येथे आले होते. रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी हा मुलगा शेतात गेला होता. याचवेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संजीव मृत्यु झाला आहे. शेतातच राहत असताना हा हल्ला झाला. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधील जवळपास 5 हजार मजूर जुन्नर-आंबेगाव तालुक्यात कांदे काढण्यासाठी दाखल झाले आहेत आणि हे मजूर रात्री शेतातच झोपत असल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान, न दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील तळेघर येथे अंगणात खेळणाऱ्या लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात ती जखमी झाली होती.