चोपडा (प्रतिनिधी) पुणे नगर वाचन मंदिरातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा , कथा लेखन स्पर्धा व अलक लेखन स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण सोहळा जेष्ठ लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांच्या हस्ते पार पडला. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालय,चोपडा जि.जळगाव येथील कु.पर्वणी प्रसाद वैद्य (इ.६वी) हिने किशोर गटातून तृतीय क्रमांकाचे तर कु. नेहा महेश पाटील (इ.१०वी) हिने कुमार गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
यावेळी वाचक आणि लेखक घडवण्याचे मोठे काम पुणे नगर वाचन मंदिर करत आहे. नगर वाचनच्या अशा उपक्रमांमुळे अनेक तरुण लेखक निर्माण होतील. वैभवशाली साहित्य परंपरा जपण्याचे व पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम ही संस्था करत आहे, असे मत डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी लोकसाधना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर हे उपस्थित होते. या समारंभात ‘पुनवा’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर , लोकसाधना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर व सचिव कैवल्य दांडेकर उपस्थित होते.
ग्रामीण भागात आजही प्रतिभावान लेखक असून त्या लेखकांच्या शब्दांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचे काम पुणे नगर वाचन मंदिर करत आहे , अशी भावना डॉ. राजा दांडेकर यांनी व्यक्त केली. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालय,चोपडा जि.जळगाव येथील कु.पर्वणी प्रसाद वैद्य (इ.६वी) हिने किशोर गटातून तृतीय क्रमांकाचे तर कु. नेहा महेश पाटील (इ.१०वी) हिने कुमार गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. विद्यालयातील उपशिक्षिका सौ.माधुरी हळपे यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष श्री. घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त,मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे व पालकवृंद यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे कौतुक व अभिनंदन केले.