TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मी नामर्द नाही, तुमची खिचडी कशी शिजवायची ती शिजवू शकतो ; उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ‘मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्कृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

 

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने दैनिक सामनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

राज्यात काही दिवसांपूर्वी मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर मोठं राजकारण पेटलं होतं. भाजपाकडून मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात आंदोलनं झाली. ही आंदोलन सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिंदुत्वाच्या मुद्यावरून डिवचलं होतं. राज्यपालांनी उपस्थित केलेल्या हिंदुत्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून उत्तर दिलं. “हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

 

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज्यपाल व भाजपाकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. “अनेकदा सध्या असं वर्षभरात दिसतं.. खरं तर देशात हे चित्र दुर्मिळ आहे की, एक बहुमताचं सरकार काम करत असताना राजभवनामध्ये समांतर सरकार चालू आहे. एक समान धागा याच्यात असा आहे की, राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का?,” असं संजय राऊत म्हणाले. या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले,”जाऊ द्या हो, करू दे हो… करू दे त्यांना मजा. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला.

महाराष्ट्र ठामपणाने एक एक पाऊल पुढे टाकत चालला आहे. केंद्र आणि राज्याविषयी तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की, माणुसकी मरता कामा नये. ठीक आहे कोणी आज पंतप्रधान असेल. उद्या दुसरा असेल. पुणी आज मुख्यमंत्री आहे. उद्या दुसरा असेल. पण आपण मुळात इथे का बसलो आहे. इकडे पक्षाभेद विसरून तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. तुम्ही शपथ घेता ना… सर्वांना समान न्याय तुम्ही दिला पाहिजे. तो जर न देता तुम्ही त्याच्यात पक्षपात करत असाल तर मात्र तुम्ही त्या खुर्चीत बसायच्या लायकीचे नाहीत. मग मला असं वाटतं की, या अत्यंत कठीण काळात महाराष्ट्राने जे काही काम केले आहे ते या 28 तारखेला आम्ही जनतेसमोर ठेवतो आहोत. नाही म्हटलं तरी एक पुस्तकच झालेलं आहे.

“मंदिरे उघडण्याच्या निमित्ताने हा विषय सुरुवातीला आला. आपण आता मंदिरे उघडलेली आहात, पण मंदिरं उघडणं आणि हिंदुत्व यांचा काही संबंध आहे का?,” असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला. “मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय… मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतंय… राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही. मग हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे काय? त्याने करोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका… आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. पहिलं या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व… आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका,” असं टीका ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : धारदार शस्त्राने जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याची हत्या !

July 10, 2024

महिलेची ६० लाखात फसवणूक, जीवेठार मारण्याचीही धमकी ; अनिल चौधरींविरुद्ध गुन्हा दाखल

January 23, 2021

मुक्ताईनगर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

May 27, 2021

बोदवड : मनूर बुद्रुक येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून संपवली जीवनयात्रा !

August 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group